v

vaidyanurag

Profile Photo
Empty
Actions
General Info
Full Name
Anurag Vaidya
Country
India
Gender
Man
City
Pune
Description

तुम्ही म्हणाल तसा....!!!

मी असाच आहे,...
मी असाच आहे,
थोडासा वेडा नि थोडासा हरवलेला,
रखरखत्या उन्हात ,
मी आसवांनी थोडासा भिजलेला.

मी असाच आहे,
थोडासा तिचा नि थोडासा शब्दांचा,
माझ्यात मी कधीच नसतो,
माझ्या नसण्यात थोडासा मी माझ्या प्रारब्धाचा

मी असाच आहे,
तुज़वरी प्रेम करूनही तुला काही न सांगणारा,
कधी आलीच समोर तू तर ,
माझ्या ओठांना माझेच शब्द मागणारा.

मी असाच आहे,
स्वतःवर राहून राहून हसणारा,
मिळाले क्षणिक सुख जर मला,
तर मात्र घाबरून शांतच बसणारा....

मी असाच आहे,
श्वासांनी नाही शब्दांनी जगणारा,
कुणी मागितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी,
तारा बनून तूटणारा...................
मी असाच आहे.............माझ्यासारखा...!!!

Profile Comments
Order by: 
Per page:
 
  • There are no comments yet