General Info
Full Name
SWACHHAND BHRAMANTI PRATISHTAN
Country
India
Gender
Man
City
MUMBAI
Description

ट्रेकिंग म्हणजे केवळ सहल किंवा पिकनिक नव्हे तर ट्रेकिंग म्हणजे  "स्व" ला विसरायला लावणारं वेड , नव्या अडचणी,नवीन आव्हाने,  नवी संकटं, अविस्मरणीय असे अनुभव,आणि जबरदस्त आत्मविश्‍वास. महाराष्ट्राला सुंदर सागरी किनारा, अनेक नद्या,सह्याद्री-सातपुडासारख्या डोंगररांगा, जंगल, अभयारण्ये, मंदिरे, गडकिल्ले, इत्यादी ब-याच गोष्टी लाभलेल्या आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि इतिहासदेखील लाभला आहे. ट्रेकिंगच्या माध्यमातून निसर्गाचा मान राखत, जबाबदारीनं वागत ह्या गीरीदुर्गांमागे दडलेला आपला वैभवशाली इतिहास जाणावा आणि या ऐतिहासिक वास्तूंची व सभोवतालच्या निसर्गाची जपणूक व्हावी हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून, केवळ आपणच सह्यादीत भटकंती करून गड किल्यांचे दर्शन घेण्यापेक्षा इतरांनाही या गड किल्ल्यांच्या स्थानाबद्दल आणि आजच्या घडीला होत असलेल्या बदलांची परिपूर्ण माहिती मिळावी , या गड किल्ल्यांची महती व इतिहास समजावा उमगावा आणि थोड्या वाकड्या वाटेने भटकंती करत ट्रेकिंगला जाण्याची आवड निर्माण व्हावी , वाढावी म्हणूनच “स्वच्छंद चा ‘ एक प्रयत्न………..गाज निसर्गाची भाव स्वच्छंदपणे जगण्याचा मनमुराद भटकण्याचा … स्वच्छंद

Additional information
Relationship Status
Single