General Info
Full Name
Rock Climbers Club India
Country
India
Gender
Man
City
Mumbai
Description

'रॉक क्लाइम्बर्स क्लब' च्या इन्टरनेटवरील पानाला भेट दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद.

गिर्यारोहण व पर्यटनाशी निगडित असणारी आमची 'रॉक क्लाइम्बर्स क्लब' ही संस्था २००४ सालापासून कार्यरत आहे. गिर्यारोहाणाची आवड असणारी काही तरुण मंडळी एकत्र येवून ही संस्था आकाराला आली. हरिश्चंद्र गड़ाने सुरुवात करून आजवर अंदाजे ४० किल्ल्याची भ्रमंती आम्ही केली आहे. गेल्या ७ वर्षात फक्त ४० किल्ले होण्याचे कारण आम्ही सर्वजण आपापले नोकरी-धंदे संभाळत ही भ्रमंती करत आहोत. पण केले गेलेले गिरिभ्रमण हे नक्कीच १००% केल्याने आमच्याकडे किल्ल्यांची जास्तीत जास्त माहिती साठवली गेली आहे. गिर्यारोहण व पर्यटनाशी निगडित अशा माहितीचे एक संकेत-स्थळ लवकरच सुरु करण्याचा आमचा मानस आहे. तो पूर्णत्वास नेणे हे तो श्रींची इच्छा.

२७ जूलै २०११ रोजी आम्ही 'रॉक क्लाइम्बर्स क्लब' ही आमची संस्था नोंदणीकृत करवून घेतली आहे. आगामी काळात किल्ले व पर्यतानाविषयी छायाचित्र प्रदर्शने, ध्वनि- चित्रफितिंची प्रदर्शने, पुरस्कार समारंभ, इत्यादि आयोजित करणार आहोत. या सर्वांसाठी कोणत्याही प्रकारची मदत तुमच्याकडून होणार असेल तर आम्हाला इमेल करावा ही विनंती.

'सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा' ह्या पर्यटन विषयक इ-मासिकाचा शुभारम्भ में, २०११ रोजी झाला असून ऑगस्ट, २०११ रोजी चौथा अंक प्रसिद्ध केला गेला आहे. तुम्हाला ह्या मासिकाची इ-प्रत हवी असल्यास आम्हाला त्याबाबत इमेल करा.

धन्यवाद.

Additional information
Relationship Status
Single