Description

दी नेचर लव्हर्स "साहस हा पाया आणि निसर्ग संवर्धन हे ध्येय"
आयोजित
“कर्जत ते १ ट्री हिल माथेरान” ट्रेक (वर्ष ३१ वे)
रविवार दि. २८ जून २०१५
आपल्या गत वर्षाच्या कालखंडात संस्थेने तरुणांच्या शारीरिक,,मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अनेक उत्तोमत्तोम कार्यक्रमांचे आयोजन करून "तरुणांनी तरुणांसाठी चालवलेली युवक संस्था असा नावलौकिक मिळवला आहे.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या गड कोट किल्ल्यांवर आखली जाणारी"दुर्गभ्रमंती", हा तरुण वर्गात सर्वात लोकप्रिय असणारा संस्थेचा उपक्रम ! आजवर संस्थेने अश्या अनेक किल्ल्यांवर मान्यवर इतिहास अभ्यासाकांसामावेत दुर्गभ्रमण सहली आखून त्यातून मराठ्यांचा स्फूर्तीदायी इतिहासजागवण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ किल्ल्यांवर सहल म्हणून न जाता ही भटकंती डोळस असावी असा संस्थेचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे...!
विनोद पाटील
दी नेचर लव्हर्स
असिस्टंट फील्ड इनचार्ज
९८९२६५८४७५

Regards,
Vinod Patil
Asst. Field In-charge
The Nature Lovers
9892658475

चला ट्रेकिंग ला....! निसर्गात चिंब भिजायला...!
दरवर्षी प्रमाणे चातक पावसाची आणि वारकरी पंढरीच्या आषाढी एकादशीची वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकर दरवर्षी वाट पाहात असतो ती “दी नेचर लव्हर्स”च्या “कर्जत ते माथेरान १ ट्री हिल पावसाळी ट्रेकची”. यंदा या ट्रेकचे ३१ वे वर्ष ….
पावसाळा म्हणजे आपल्यासारख्या भटक्यांना वरदानचं...! मस्तपैकी सह्याद्रीच्या दरयाखोऱ्यात मनसोक्त भटकावे, बरोबर आणलेल्या जेवणावर चोपून ताव मारावा, झुळझुळणारया ओढ्यातील पाणी पिऊन मन तृप्त करावे, कोसळनाऱ्या धबधब्याखाली अंग शेकून काढावे व टपरीवरचा गरमागरम चहा मारून दिवसभरातल्या आठवणीमध्ये गर्क व्हावे आणि दुसऱ्या दिवशी परत नव्या उत्साहाने दिनक्रम सुरु करावा….!
डोंगररांगातून पायऱ्यांची शेती, अवखळपणे धावणारे झरे, पायवाटांतून आडवे-तिडवे पळणारे खेकडे... पावसाळ्यातल्या या निसर्गाच्या सान्निध्यातला पावसाळ्याचा आनंद लुटायचा असेल तर
“कर्जत ते १ ट्री हिल माथेरान ट्रेक” ला जायलाच पाहिजे.
आणि म्हणूनच तुमच्यासाठी, 'दी नेचर लव्हर्स, ने “कर्जत ते १ ट्री हिल माथेरान ट्रेक”
(वर्ष ३१ वे) रविवार दि. २८ जून २०१५ रोजी आयोजित केला आहे
ट्रेकर्सनी शनिवार दि. २७ जून रोजी रात्री ११.३० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मुख्य इंडिकेटर खाली कर्जत पर्यंतचे तिकीट काढून जमणे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा :-
ट्रेक नेता : एनएल. संजय बोर्लीकर ९८९२४७३४९७
ट्रेक उपनेती : एनएल. दीप्ती ठाकूर ९८६९३८५५३१
ट्रेकचा खर्च अंदाजे रुपये १००/-
** नियम व अटी लागू
** वरील कोणत्या हि अथवा ट्रेकच्या बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थेकडे राहतील.
दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे. जर धुम्रपान आणि मद्यपान करताना असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल...!
Say NO to :-
# Smocking, Alcohol, Tobacco
# over use of plastics
# Expensive Ornaments
Say YES to :-
# Team Spirit
# Clean Environment
# Fun & Joy
Things to be carry :-
# Identity Proof (must)
# A haversack to put all these things. (No Sling Bags, Jholaas)
# Comfortable trekking Shoes, pair of sleepers or sandals.
# 2 litters of Water & Torch Compulsory
# Food Packed tiffin for Sunday lunch. Some dry snack items (plum cakes, biscuits etc.)
# Medicine if you require usually
# Extra Pair of clothing. Bedding for self.
# Plastic bags to protect your belongings from rain.
निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेली हि ठिकाणे असाच काहीसा अनुभव देतात. मग येताय ना पावसाळी भटकंतीला..! आमच्यासोबत…
एनएल. विनोद पाटील
दी नेचर लव्हर्स - असिस्टंट फील्ड इनचार्ज – ९८९२६५८४७५

Photos
Rate
2 votes