Description

गिरी प्रेमी आणि निसर्ग प्रेमी आम्ही Sahyadriking Trekkers ग्रुप ने
निसर्गाचे आचर्य असलेल्या "सांधन घलइ "चा 2 दिवसाचा ट्रैक आयोजित केला आहे.
दिनांक:31ओक्टबर आणी 01नोव्हेंबर.2015 या दोन दिवसात.

सह्याद्रीचे आकर्षण म्हणजे सांदण दरी.....
एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते.मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते.अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते। अंदाजे घळीची लांबी एक किलोमीटर आहे। त्यानंतर समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसतो त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे असे वाटू लागते। एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच दोराच्या आधाराने पार कराव्यात.दरी मध्ये 2-3 ठिकाणी दोरीच्या साह्याने खड़क भिंत उतरावी लागते.अर्थातच (Rappelling) करुण खाली जावे लागते.दरी पूर्ण उतरून गेल्यावर एक मोठे पाण्याचे डबके लागते,त्यात काहि लोक अंघोळ करतात.मुकाम करण्यासाठी ती चांगली जागा आहे.

मुंबई कडुन येणाऱ्या लोकांसाठी:
शुक्रवारी रात्रि छ.शि.टर्मिनस वरुण पकड़ायचि रेल्वे
10:50 pm – छ.शि.टर्मिनस
10:57 pm – भायकला.
11:05 pm – दादर
11:13 pm – कुर्ला
11:18 pm – घाटकोपर
11:34 pm – ठाणे
11:57 pm – डोम्बिवली
12:07 am – कल्याण
01:18 am – कसारा

पुणे कडुन येणाऱ्या लोकांसाठी
या नो वर फ़ोन करणे:8605556325
दिवस 1ला
01:30 am – सगल्यानी जमा होणे
04:00 am – जवळ च्या गावात जावु आणि आराम करु सकाळी 6am पर्यन्त
6:30am ला नास्टा मिळेल
त्यानंतर ट्रैक ला सुरुवात होईल.12 वाजेपर्यंत आपन पहिल्या रप्पल्लीन्ग पॉइंट पर्यन्त असु.
तेथे पोहचलयावर दुपारचे जेवण होईल त्याबरोबर रप्पल्लीन्ग पन
असे करत -करत आपल्याला पुर्ण दरी उतरून खाली जायला संध्यकालचे 5 वाजतात.
कैम्पिंग पॉइंट ला पोहचलयावर चहा आणि स्नाक होईल.
नंतर तंबू लावण्यात येतील.
रात्री जेवण झाल्यावर गाने तसेच आग पेटवून कैम्प केला जाइल.
दिवस 2 रा:
सकाळी 6 वजता उठवले जाइल,फ्रेश आणि अंघोलिचा कार्यक्रम उरकलयावर
नास्ता मिळेल.
साधारण 9:00am पर्यन्त सगळे झाल्यावर आपल्याला देहने गावाचया दिशेने वाटचाल करावि लागेल
11 वाजता देहने गावा मध्ये जेवण केलयावर आपन गाडिने मुम्बई च्या दिशेने परत निघु.
साधारण आपन 5 पर्यन्त सगले घरी पोहचु.

ट्रैक शुल्क
मुंबई कडूंन येणाऱ्या साठी:1600.00रु.
पूणे कडुन येणाऱ्या लोकांसाठी:2000.00रु.
यामध्ये-
प्रवासाचा खर्च,
रप्पल्लीन्ग चा खर्च'
जेवण आणि नास्ता चा खर्च'
तंबू खर्च,
मार्गदर्शक आणि एक्सपर्ट,
आणि आमच्या ग्रुप चा चार्ज.

बैंक माहिती:
Bank Name: State Bank of India
Branch:Rajur
Name:Prakash Soma Bande
Account No:31440260218
IFS Code:SBIN0005399
MICR Code:422002461
संपर्क:
प्रकाश-8605556325(whats app),
7744003602.
"Sahyadriking Trekkers"
धन्यवाद!

Photos
Rate
0 votes