Description

किल्ले कर्नाळा
शिवशोर्य ट्रेकर्स आयोजित किल्ले कर्नाळा मोहीम

फक्त वय वर्ष ५ ते १४ (इ. १ली ते १०वी)

सामाजिक बांधिलकी म्हणून शिवशोर्यने मोहिमेच्या दरम्यान अनेक उपक्रम राबवले. आताही हीच जाणीव कायम ठेवत. लहान मुलांना प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्याची गोडी लागावी म्हणून संपूर्ण मोहीम निशुल्क आयोजित केली आहे. त्यासाठी आम्ही निवडला आहे मुंबईच्या जवळ असणारा किल्ले कर्नाळा.
दि. १ मे २०१५ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वय वर्ष ५ ते १४ (इ. १ली ते १०वी) या वयोगटातील मुला मुलींसाठी निशुल्क ट्रेक आयोजित केला आहे.
मोहिमेत सदस्य संख्या फक्त ५० इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे.

शुक्रवार दि. १ मे २०१५ सकाळी ८ वा. एल्फिनस्टन / परळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) बाहेरून खाजगी बसने कर्नाळा किल्ल्याकडे रवाना.
स्वतः सोबत शाळेचे ओळखपत्र, दुपारच्या जेवणाचा डबा, १ लिटर पाण्याची बाटली, टोपी, सुका खाऊ (तेलकट नसलेला), बूट या सर्व वस्तू आणणे अत्यंत आवश्यक आहे, या सर्व वस्तू दोन्ही खांद्यावर घेत येईल अश्या ब्यागेत भरून आणाव्या. वनक्षेत्रात प्लास्टिक पिशव्या नेण्यास बंदी आहे.
सायंकाळी ६ वा. एल्फिनस्टन / परळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) बाहेर मोहिमेची सांगता होईल. सर्व मुलाना त्यांच्या पालकांच्या हातातच सोपवले जाइल.
संपर्क क्र. 9320755539 / 9869109970 / 9869084912 / 9967493532

विशेष सूचना :
नाव नोंदणी साठी 9320755539 या क्र . वर संपर्क साधून नाव नोंदणी करू शकता. जर काही कारणास्तव नाव नोंदणी करून आपल्या मुलांना पाठविणे शक्य नसल्यास त्याची त्वरित पूर्व कल्पना आम्हाला द्यावी. जेणे करून इतर मुलांना या ट्रेकचा लाभ घेत येईल

आपला नम्र

कु. मित कासकर
(मोहीम प्रमुख)