Description

भेटण्याचे ठिकाण - कामतहॉटेल समोर,खंडाला ब्रिज खाली सकाळी ठीक 8.30 वाजता.

पोहचण्याचे मार्ग -
1.मुंबईवरुन -
train-इंद्रायणी एक्सप्रेस पकडून लोनावाला येथे उतरणे.तिथून लोनावाला ST डेपो जवळून शेयर रिक्शा
ST Bus- खंडाला exit ला उतरणे आणि ब्रिज खाली चालत येणे.
2.पुणे,सातारा,सांगली,कोल्हापुर-
पुणे स्टेशन वरुन सिंहगड एक्सप्रेस ने खंडाला स्टेशन ला उतरने.आणि तिथेच स्टेशन बाहेर भैरवनाथ मंदिराजवळ एकत्र येणे.

सोबत घ्यावयाच्या वस्तु- दुपाराचे जेवण,2 लीटर पाणी, extra कपडे आणि टॉवेल.पावसाळी जैकेट्स. ट्रैकिंग शूज असल्यास उत्तम.
हे सर्व एका छोट्या बैगत आणावे.
अंगावर शक्यतो फुल tshirflt आणि फुल pant/trek pant असावी.

हे टाळावे- मौल्यवान वस्तु , हाफ स्लीव टीशर्ट आणि 3/4 पैन्ट्स.

सहभाग मूल्य-₹ 200.

मोहिमेविषयी -
16 ऑगस्ट ला सकाळी भरपेट नाश्ता उरकून 8.30 वाजे पर्यंत भैरवनाथ मंदिर ,खंडाला स्टेशन जवळ भेटावे. ही मोहीम अंदाजे 20किमी ची आहे आणि जंगल भागातुंन आहे .त्यामुळे पाठीवर जितके कमी वजन असेल तितके चांगले.
खंडाला येथे भेटल्यावर मोहिमे विषयी सविस्तर माहिती देण्यात येईल.
तिथून आपण tata dam जवळून पलीकडे कुरवंडा येथे पोहचू.
आपली खरी मोहीम येथून सुरु होईल.
या मोहिमे विषयी भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती कुरवण्डा येथे दिली जाईल.
मग आपणास छावनी या कोकणातील गावी उतरायचे आहे. कुरवण्डा घाट उतरून छावनी ला पोहोचवायस आपणस अंदाजे 2 वाजतील.तिथून आपण समरभूमि स्मारकस वंदन करायचे. एथे अजुन माहिती दिली जाईल.
आणि मग आपले जेवण आटपुन आपणस खोपोली ला private वाहनाने सोडले जाईल. आपण अंदाजे संध्याकाळी 6 वाजे पर्यन्त खोपोली ला असु !

महत्वाची माहिती -
1. मोहिम सुरु होण्याआधी भरपेट नाष्टा करावा कारण जेवण अंदाजे 2-3 वाजता स्मारका जवळ पोहोचल्यावर होईल. दुपाराचे जेवण अवश्य आणावे कारण खंडाला सोडल्यावर डायरेक्ट खोपोली ला हॉटेल्स आहेत. मधे खाण्यासाठी सोबत काहीतरी असलेले चांगलेच.
2. फुल shirt/tshirt आणि pant घालावी जेनेकरुन काट्या चा आणि rashes चा त्रास होणार नाही.
3. मोबाइल जरूर असावा पण शक्यतो तो vibrate वर ठेवावा उगाच जंगलात आणि निसर्गात आपला व्यत्यय नको.
4. कैमरा जरूर आणावा पण पाऊस आणि पाणी याचे भान ठेवावे . मोहीम वेळेत होणे गरजेचे आहे तेंव्हा वेळेचे भान राखून फोटोग्राफी करावी .
5.आपण 2 ठिकाणी अम्बा नदी ओलंडनार आहोत. तेंव्हा नदीत डुंबत बसून वेळ वाया घालवू नये. तसेच पाण्याचा प्रवाह वेगवान असतो तेंव्हा सावधगिरी बाळगावी.
6.आपला जीव आणि ही मोहीम दोन्हीही महत्यवाच्या आहेत तेंव्हा कृपया दिलेल्या सूचनांचे पालन करावे.कारण या दोन्ही गोष्टीं ची जबाबदारी स्वतः आणि माझ्यावर असेल.
7. ही एक ऐतिहासिक मोहीम आहे त्यामुळे उगाच पिकनिक म्हणून न येता छत्रपति शिवरायांच्या पदस्पर्शने पावन झालेल्या या भूमीत आणि या समरभूमि चा लढ़ा समजावून घ्यावा ही नम्र विनंती !
8. पाऊस असेल त्या प्रमाणे वस्तु आणि आपण भीजु नये याची अवश्य काळजी घेणे !

भेटुयाच या मोहिमेला गड्यानो!
जय भवानी ! जय शिवराय !!

किरण शेलार.
9833706672.