Description

नमस्कार,

गिरिप्रेमी, पुणे संस्थेच्या आठ गिर्यारोहकांनी गेल्याच महिन्यात जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर महाराष्ट्राची पताका फडकावली.
गिरिप्रेमीची मोहीम ही गेल्या वर्षभरापासून अखिल महाराष्ट्राचीच मोहीम बनली होती. एव्हरेस्टचे आव्हान त्यांनी कसे पेलले, त्यात आव्हाने
कोणती होती आणि या यशपूर्तीचा गिर्यारोहणाला कसा लाभ होईल, याविषयी सर्वांच्याच मनात या एव्हरेस्टवीरांकडून जाणून घेण्याची
उत्कंठा आहे. त्यामुळेच गिरिप्रेमींच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी चक्रम हायकर्सतर्फे मुंबईत एव्हरेस्टवीरांचे कौतुक करण्याचा समारंभ
शनिवार दि. ३० जून २०१२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मुलुंड (पूर्व) येथील मराठा मंडळ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. समारंभात
पुणे-एव्हरेस्टच्या मोहीम सदस्यांकडून मोहिमेविषयी दृक् श्राव्य सादरीकरण तसेच मुलाखतीद्वारे त्यांचे अनुभवकथन होणार आहे.
सदर कार्यक्रमाची पत्रिका सोबत जोडत आहोत.

आपल्याला आग्रहाचे निमंत्रण.  आपल्या मित्रांनादेखील या कार्यक्रमाबद्दल माहिती द्यावी, ही विनंती.

आपला नम्र,

चक्रम हायकर्स करीता,
राजन महाजन

टीप - कार्यक्रम वेळेवर सुरु होईल.

Photos
Rate
0 votes