Description

यशवंती Adventures, गिरगाव तर्फे " सरसगड श्रमदान मोहिम" दि. २१ व २२ मे, २०१६ रोजी आयोजित करण्यात येत आहे तरी आपण सुद्धा या शिवकार्यात सहभागी व्हा.

 

यशवंती Adventures, गिरगाव हि गिरगांवात जन्मलेली आणि गिरगांवात वाढणारी संस्था गेली ४ वर्ष किल्ले सरसगड येथे दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. महाराष्ट्रातील किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा मान, महाराष्ट्राचा इतिहास. केवळ भावनिक जोड नाही, तर हे स्थापत्यशास्त्राचे उत्तम नमुने आहेत. अनेकदा पायथ्याशी असलेल्या गावात पाणी नसत पण किल्ल्यांवर मात्र बारमाही पाणी असत. पण हेच किल्ले आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या पिढीला किल्ले बघता याव म्हणून ते दाखवण्याच्या हेतू घेऊन जन्माला आलेली हि संस्था ते पुढच्या पिढीलाही किल्ले बघता यावेत म्हणून प्रयत्न करत आहे.  

येत्या २१ व २२ मे, २०१६ रोजी सरसगड पाली येथे श्रमदान आयोजित केले आहे, पाण्याचं टाक साफ करण्याचा मानस आहे, जेणे करून गाळ काढला जाईल आणि येत्या पावसाळ्यात चांगलं पाणी जमा होऊन त्याचा फायदा ट्रेकर्स ना होऊ शकेल.

मोहिम शुल्क: १०० रु

 

मोहिमेत तुमच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागासाठी संपर्क करा

भरत म्हदाये :-९७७३४१०९१७

गौरव भावे ९६९९८१४६२५

संतोष गुरव :-९२२२९२२०४८

Photos
Rate
0 votes