Description

नमस्कार,
ठरल्याप्रमाणे पुढच्या रविवारी दि २९ जुलै रोजी दुर्गवाटा तर्फे किल्ले कर्नाळ्यावर जाण्याचा बेत आखला आहे. पुणे आणि मुंबईवरून आपण येऊ शकता. पुणेकर आणि मुंबईकर मित्रांसाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक आखले आहे.
पुणे:
१) सकाळी ७ ला पुणे स्टेशन वर भेटणे.
२) प्रगती एक्ष्प्रेसने पनवेल गाठणे.
३) पनवेल ते कर्नाळा रिक्षाने प्रवास.
४) साधारणपणे ११पर्यंत ट्रेकची सुरवात.
५) १ पर्यंत गडमाथा गाठणे 
६) जेवण 
७) उतरायला सुरवात 
८) परत कर्नाळा ते पेण आणि पेण ते लोणावळा असा बस ने प्रवास.
९) लोणावळा वरून लोकल ने पुणे गाठणे.मुंबई:
१) भेटण्याचे ठिकाण ठाणे सकाळी ८.15 वाजता
२) ८.४५ च्या लोकल ने पनवेल कडे प्रस्थान (ठाणे- वाशी- नेरूळ - पनवेल मार्ग) 
३) पनवेल ते कर्नाळा असा रिक्षाने प्रवास
४) पुणेकर आणि मुंबईकर कर्नाळ्याच्या पायथ्याला भेटतील
५) साधारण पणे १०.३० पर्यंत ट्रेकची सुरवात.
६) १ पर्यंत गडमाथा गाठणे 
७) जेवण 
८) उतरायला सुरवात 
९) परत कर्नाळा ते पनवेल रिक्षाने प्रवास
१०) पनवेल ते ठाणे लोकल ने मुंबई गाठणे.****
टीप: पुण्याचे वेळापत्रकाबद्दल: सध्या प्रगती एक्ष्प्रेस ही पुणे ते मुंबई दरम्यानची गाडी पनवेल मार्गे जात आहे. तिची मुदत २५ तारखेपर्यंत आहे. जर २५ नंतर सुद्धा तिचे वेळापत्रक पनवेल मार्गेच ठेवले तर आपण सुद्धा त्या गाडीने पनवेल गाठून पनवेल ते कर्नाळा हा प्रवास मुंबईकर मित्रांबरोबरच करू. त्यातून सुद्धा जर ३.३० पर्यंत खाली आलो तर परत जाताना प्रगती पकडता येणे शक्य आहे. उशीर झाल्यास नंतरचे वेळापत्रक पेण मार्गेच राहील. (हे फक्त प्रगती एक्ष्प्रेस २५ नंतर कशी जाते त्यावरच अवलंबून आहे ) 
****


आवश्यक गोष्टी:
=> २ लिटर पाणी**
=> जेवणाचा डबा**
=> पाउस असेल , म्हणून एखादी कोरड्या कपड्यांची जोडी ठेवावी.
=> चांगले न घसरणारे बूट घालावेत. फ्लोटर्स, चपला अजिबात घालू नये.**
=> स्वतःची काही औषधे असतील तर ती आणावीत.
=> रेनकोट, टोपी.
=> भ्रमणध्वनी, कॅमेरा, इतर मौल्यवान गोष्टी आपापल्या जवाबदारीवर आणाव्यात.
=> बिस्किटे, चिवडा असे खाद्यपदार्थ जवळ असतील तर चांगले.ट्रेकची फी: 
>> रुपये ४००/- (पुणेकर),
>> रुपये ३००/- (मुंबईकर)
>> फी मध्ये वाहतूक खर्च तसेच चहा (सकाळ/संध्याकाळ), न्याहारी, आवश्यक औषधे ई चा समावेश आहे.


संपर्क:

पुण्यातून येण्यासाठी:
केतन लिमये (९०२८९८९६७०/८६९८००२५४९)
केतन मावळे (९४२२५७०९९०)
अपूर्व दाते ( ८०८७८७३१९०)
मधुर डांगे (९६०४९९६६३६)

मुंबईतून येण्यासाठी:
मयुरेश दातार ( ८०८२४३८२३९/९९६९७८३६०९)
सुरभी केणी ( ९८७०४९५५९५)