Post view

Sahyadri Trekkers Bloggers

Vision : To make Sahyadri Trekker blogs an effective tool of education.

Mission: To educate the readers and viewers of various online contents related to Sahyadri, in outdoor ethics, safety, importance of monuments and importance of biodiversity, through positive and aggressive process of online publishing.

 

https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/?fref=ts

http://sahyadritrekkersbloggers.blogspot.in/

नमस्कार गिरीमित्रांनो व भटक्यांनो,

सह्याद्रीतल्या ट्रेकिंगचा "Peak Season" नुकताच सुरु झाला आहे आणि गडकोटांकडे,घाटवाटांकडे गिर्यारोहकांची पावलं वळू लागली आहेत. पण वाढत्या ट्रेकिंग संस्कृतीबरोबर काही उत्साही पर्यटकांमुळे सह्याद्रीला आणि त्याच्या जैवविविधतेला धोका उत्पन्न झाल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. जिथे जाऊ तिथे दारूच्या बाटल्यांचा खच,सिगारेटची पाकिटं, कचरा, आधीच मरणासन्न अवस्था भोगणा-या अवशेषांवर लिहिल्या जाणा-या प्रेमकहाण्या आणि त्

याला खतपाणी घालणारे बेताल पर्यटक हे दृश्य आता सहन करण्याच्या पलीकडे गेलं आहे. निव्वळ निष्काळजीपणामुळे डोंगरांमधील वाढू लागलेले अपघात हाही चिंतेचा विषय आहेच.त्यामुळे तैलबैला येथे नुकत्याच पार पडलेल्या Sahyadri Trekkers Bloggers Meet मध्ये या सर्व गोष्टींना अंकुश बसावा आणि गिर्यारोहण सुरळीत व्हावं यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचलण्यात आलं आहे.

Sahyadri Trekkers Bloggers च्या सदस्यांनी काही प्रतिबंधात्मक चिन्ह तयार केली असून त्याचे फ्लेक्स प्रत्येक किल्ल्यावर,घाटवाटेवर व पर्यटनस्थळांवर व्यवस्थित दिसतील अशा ठिकाणी लावण्यात येणार आहेत. यातील पहिला फ्लेक्स सांधण व्हॅली इथे लावला गेला असून इतर ठिकाणीही खाली दिलेला फ्लेक्स लावला जाणार आहे.

हे मिशन महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचावं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळावा यासाठी एक सुजाण गिर्यारोहक म्हणून आपणा सर्वांना हे आवाहन आहे की इथून पुढे आपण जिथे ट्रेकिंगसाठी जाऊ तिथे हा फ्लेक्स 4x3 च्या साईझमध्ये लावण्यात यावा जेणेकरून त्या ठिकाणी जाणा-या ट्रेकर्सना डोंगरात काय करावं व काय करू नये याचा उलगडा अगदी व्यवस्थित होईल व आपले उद्दिष्ट सफल होण्यास मदत होईल.प्रबोधनाचं हे एक माध्यम यशस्वी केल्यास आपला सह्याद्री एक नवं रूप धारण करेल यात शंकाच नाही. गरज आहे ती आपल्या सहकार्याची व सहभागाची !! एका फ्लेक्सच्या माफक खर्चात जर आपला लाखमोलाचा सह्याद्री पुन्हा उजळून निघणार असेल तर इतना तो बनता है बॉस !!!

पुन्हा एकदा आवाहन...आपला सह्याद्री वाचवण्यासाठी वेळ आली आहे ती आता ही वज्रमूठ बांधण्याची व हे पहिलं पाऊल यशस्वी करण्यासाठी नव्या जोमाने एकत्र येण्याची !!

फ्लेक्सच्या Printable Image साठी खालील लिंकवरुन डाऊनलोड करा.

https://drive.google.com/…/0B0I9ip9UpeHVVmU2OExKU2ZOQ…/view… (अंदाजे एकूण फाईल साईज २८ एमबी)

किंवा

sahyadri.trekkers.bloggers@gmail.com या ईमेल आयडीवर Test Mail करा. तुम्हाला फ्लेक्सची Printable Image पाठवली जाईल.

#Awareness #Initiative #SavetheSahyadri

(Text by Onkar Oak, sketeches by अजय काकडे)

 

 

Dear outdoor enthusiasts.

In the light of recent incidents of misbehavior (and mishaps) we are in extreme need of safety awareness. There is no better language than pictures/images. We as a Sahyadri Trekkers Bloggers have decided to encourage culture of personal as well group safety and outdoor ethics through these signs. These are first draft images of the signs we have came up with the help of our very own artist Ajay Kakade. We will be refining these as well as adding few more so that these become universal signs in the laps of Sahyadris. Till that please share these signs.
You can feel free to download this image and share among your groups, FB pages, set as cover photos.

भटकंती मित्रांनो,

गेल्या काही काळातल्या बेजबाबदार वर्तन आणि काही दुर्दैवी घटना पाहता सह्याद्रीत फिरताना काही सुरक्षाविषयक संदेशांची गरज निर्माण झाली आहे असे वाटते. त्यासाठी चित्रांपेक्षा अधिक चांगली दुसरी भाषा नाही. यासाठीच सह्याद्री ट्रेकर्स ब्लॉगर्स या आपल्या अनौपचारिक ग्रुपतर्फे आम्ही या चिन्हांद्वारे वैयक्तिक आणि समूहाच्या सुरक्षेकरिता तसेच भटकंती करताना अपेक्षित असलेल्या वर्तनाकरिता जागृतिपर संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यातल्याच अजय काकडे या मित्राने हे संदेश तयार करुन दिले आहेत. पुढील काही दिवसांत या चिन्हांमध्ये आवश्यक बदल करुन आणि काही नवीन तयार करुन आपण सह्यभ्रमंतीची एक वेगळी सर्वसमावेशक चिन्हांची भाषा तयार करु शकू. तोपर्यंत या चिन्हांचा प्रचार आणि प्रसार आपल्याच हाती आहे.
आपण ही चिन्हे डाऊनलोड करुन आपल्या ग्रुप्समध्ये पोचवू शकता किंवा फेसबुकवर प्रसारित करु शकता.

blogs

http://unadbhatkantee.blogspot.in/2016/12/blog-post_24.html?view=magazine&m=1

mumbaihikers 04.01.2017 0 760
Comments
Order by: 
Per page:
 
  • There are no comments yet
Post info
mumbaihikers
Welcome to the trekkers community
04.01.2017 (341 days ago)
Rate
1 votes
Actions
Recommend
Categories
Trekking (2 posts)