S

SHIVRAJABHISHEKSAMITI

Actions
General Info
Full Name
PRAVIN MOHITE
Country
India
Gender
Man
City
mumbai
Description

प्रिय शिवभक्तहो,
            सविनय नमस्कार ! 
            छत्रपती शिवाजी महाराज हे भारतवर्षाचे श्रेष्ठ युगपुरूष, त्यांचे प्रेरणादायी जीवनकार्य म्हणजे नवसंजीवनी. हा बहुमोल ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी एकत्र आलेल्या शिवभक्तांची श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड ही चळवळ. 
            गेली दहा वर्षे महाराष्ट्रासह सर्व प्रांतातून शिवभक्त एकत्र स्वरुपात दुर्गराज रायगडावर श्रीशिवराजाभिषेकदिनोत्सव अर्थात ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी साजरी करीत आहोत. ही चळवळ अधिक लोकव्यापी होऊन लोकोत्सवात परिवर्तित होताना सर्व प्रकारचे राजकीय-सामाजिक-धार्मिक पक्षभेदविरहीत अनेक विधायक उपक्रम हाती घेऊन लोकजागृतीचे कार्य करीत आहे व तरूण पिढीला एकत्र आणून शिवचरित्र प्रसारकार्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे. 
            शिवभक्तांच्या सहकार्याने मांडलेली ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होताना नोंदणीकृत सामाजिक संस्था स्वरूपात प्रकट होत आहे. शिवभक्तीची ही दिंडी पुढे नेण्यासाठी आपण सारे लवकरात लवकर समितीचे सभासद होऊन ह्या राष्ट्रीय कार्याला सिध्द व्हावे हे विनम्र आवाहन.

Profile Comments
Order by: 
Per page:
 
  • There are no comments yet